Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जेसीआय राजुरा रॉयलच्या अध्यक्षांनी दिली स्टार किड्झ पब्लिक शाळेला भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जेसीआय राजुरा रॉयलच्या अध्यक्षांनी दिली स्टार किड्झ पब्लिक शाळेला भेट जाणून घेतली शाळेसंबंधी माहिती व समस्या आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स ...
  • जेसीआय राजुरा रॉयलच्या अध्यक्षांनी दिली स्टार किड्झ पब्लिक शाळेला भेट
  • जाणून घेतली शाळेसंबंधी माहिती व समस्या
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
इंग्रजी शाळा, सीबीएसई, आयसीएसई इतकेच नव्हे तर आयबीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक आपले सर्व प्रयत्न, पैसे पणाला लावतात. मागील दोन दशकापासून हे प्रचालन सुरु असून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याऱ्या खाजगी शाळाही वाढल्या आहेत. मात्र मिशनरीज आणि मोठ्या नेत्यांच्या शाळांना टक्कर देणे या लहान इंग्रजी माध्यमांच्या शाळांना जिकरीचे जात असल्याने त्या कुठेतरी मागे पडल्या आहेत. अश्या शाळेचा शोध घेत अश्या शाळेंना कोणत्यातरी माध्यमातून मूलभूत सोयी सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजे या दृष्टिकोनातून जेसीआय राजुरा रॉयलच्या अध्यक्षा जेसी सुशीला पुरेड्डीवार यांनी उद्धार अपंग असोसिएशन द्वारे संचालित रामपूर येथील स्टार किड्झ पब्लिक शाळेला भेट दिली. जेसी सुशीला पुरेड्डीवार शाळेत जाऊन मुख्याध्यापिका कविता वाघमारे यांचेशी शाळेच्या गरजांबद्दल चौकशी केली. मुख्याध्यापिका कविता वाघमारे यांनी शाळेला लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधा व शैक्षणिक साहित्य याबाबत माहिती सादर केली. जेसी सुशीला पुरेड्डीवार यांनी याबद्दल पाठपुरावा करून योग्य सहकार्य करण्याचे वचन दिले. यावेळी जेसीआय राजुरा प्राईडच्या माजी अध्यक्षा तथा झोन ट्रेनर जेसी श्वेता जयस्वाल, शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top