Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाकाली देवीची यात्रा आजपासून
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाकाली देवीची यात्रा आजपासून दोन वर्षांनंतर घेता येणार भाविकांना दर्शन दर्शन रांगेत भाविकांसाठी फवारे शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद...
  • महाकाली देवीची यात्रा आजपासून
  • दोन वर्षांनंतर घेता येणार भाविकांना दर्शन
  • दर्शन रांगेत भाविकांसाठी फवारे
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चांदागडची आई या नावाने प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरच्या देवी महाकालीची यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी अर्थात आज 7 एप्रिलपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र-तेलंगणा-आंध्रप्रदेश-छत्तीसगड या राज्यातून लाखो भाविक महाकाली देवीच्या दर्शनासाठी या काळात चंद्रपुरात दाखल होतात. जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापन दोन वर्षाच्या कालावधीनंतर येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सज्ज झाले आहे. चंद्रपूरच्या चांदागड देवीची यात्रा 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनाकाळानंतर तब्बल दोन वर्षांनी भाविकांना या ऐतिहासिक देवस्थानातील महाकाली मातेचे मनमोकळेपणाने दर्शन घेता येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवी महाकालीच्या दर्शनासाठी लाखो भाविक या काळात चंद्रपुरात दाखल होतात. चैत्र नवरात्र निमित्त महिनाभर देवी महाकालीच्या यात्रेनिमित्त शहरात श्रद्धेचा सागर असतो.

दर्शन रांगेत भाविकांसाठी फवारे
जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उभारल्या आहेत. पाणी-शौचालय-निवास-आरोग्य यासह विविध सोयी-सुविधांसाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. चंद्रपूरचा उच्चांकी उन्हाळा लक्षात घेता दर्शन रांगेत भाविकांसाठी फवारे लावण्यात आले आहेत, अशी माहिती महाकाली मंदिराचे विश्वस्त पुजारी सुनील महाकाले तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

भक्तांना आस महाकाली देवीच्या दर्शनाची
यात्रेच्या निमित्ताने चंद्रपुरात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. चैत्र पौर्णिमेचा दिवस यात्रेचा सर्वात मोठा दिवस असतो. त्यादरम्यान शहरातील शेकडो सामाजिक संस्थाही लाखो भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. भक्तांच्या स्वागतासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले आहेत. राज्यभरातील देवी भक्तांना आता महाकाली मातेच्या दर्शनाची आस लागली. जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने आवश्यक सोयी सुविधा केल्या आहेत. पाणी-शौचालय-निवास-आरोग्य यासह विविध सोयी-सुविधांसाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. शहरातील शेकडो सामाजिक संस्थाही लाखो भाविकांच्या सेवेसाठी तत्पर राहतील.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top