Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिप शाळा खैरगाव येथे बाल आनंद मेळावा व महिला मेळावा उत्साहात संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिप शाळा खैरगाव येथे बाल आनंद मेळावा व महिला मेळावा उत्साहात संपन्न  बाल आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला, फळे, खाण्याचे पदार्थ, ...

  • जिप शाळा खैरगाव येथे बाल आनंद मेळावा व महिला मेळावा उत्साहात संपन्न 
  • बाल आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला, फळे, खाण्याचे पदार्थ, खेळण्या, शालोपयोगी वस्तूंची दुकाने मांडली
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैरगाव येथे “बाल आनंद” मेळावा व महिला मेळावा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, त्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार कळावेत, यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची  माहिती  मुख्याध्यापक बाळा आगलावे यांनी  दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत तळोधी येथील सरपंच ज्योती जेनेकर तर अध्यक्ष म्हणून उपसंरपच राजकुमार चतुरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भोयगाव केंद्र प्रमुख नामदेवराव बावणे, रोशन पिल्लेवान, सुधाकर ठाकरे, देविदास नैताम पत्रकार हबीब शेख यांची उपस्थिती लाभली. या बाल आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला, फळे, खाण्याचे पदार्थ, खेळण्या, शालोपयोगी वस्तू यांची दुकाने मांडली होती. या उपक्रामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानात चांगलीच भर पडेल असे मत सर यांनी व्यक्त केले. तर प्रमुख पाहुण्यांनी तसेच पालकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. परिसरातील नागरिकांनी बाजारात येऊन वस्तू मुलांकडून खरेदी करत कौतुक केले. या कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष अनिल गेडाम, सदस्य पुरुषोत्तम आस्कर, ममता गेडाम, शिक्षक तसेच कर्मचारी वृंद, पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top