Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: समाज आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
समाज आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे - आ. किशोर जोरगेवार यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशिन...

  • समाज आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे - आ. किशोर जोरगेवार
  • यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात असून या माध्यमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने केल्या जात आहे. हे सर्व उपक्रम सुरु असतांना समाज आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला सक्षमीकरणाचीही गरज असून स्वयंरोजगारातून त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूने हा शिलाई मशिन वाटप उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेड तथा स्व. प्रभादेवी जोरगेवार चॅरिटेबर ट्रस्टच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात शिलाई मशिन वाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, शासकिय अभियांत्रिकी महविद्यालयाचे प्राचार्य सुधीर आकोजवार, डाॅ. बंडू रामटेके, यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर प्रमुख कौसर खान आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top