Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांचा इतिहास स्फूर्ती देणारा - डॉ.मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांचा इतिहास स्फूर्ती देणारा - डॉ.मंगेश गुलवाडे भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती निमित्त अभि...

  • वीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांचा इतिहास स्फूर्ती देणारा - डॉ.मंगेश गुलवाडे
  • भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती निमित्त अभिवादन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर महानगरातील जिल्हा कारागृह परिसरातील वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मारक स्थळी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम 12 जानेवारी ला आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांचा इतिहास स्फूर्ती देणारा असून त्यांनी इंग्रजांना अनेक युध्दात पराभूत करून जमीनदारांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारून सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी लढले ही आपल्या साठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे,युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,उपाध्यक्ष भारती दुधानी,गणेश गेडाम,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी, नगरसेविका चंद्रकला सोयाम, माया उईके, शीतल कुळमेथे, विलास मसराम, दयालाल कंनाके, अशोक तुमराम, सचिव राजेंद्र खांडेकर, यश बांगडे, गणेश रामगुंडेवार, सुरपाम, अशोक उईके, बंडू गौरकार, गणेश रासपायले, गीता गेडाम, नामदेव कंनाके, सविता मसराम, पूनम गरडवा, रितेश वर्मा, नीलिमा आत्राम, अरविंद मडावी, सीमा मडावी, रवींद्र तुमराम, विकास पेंद्राम, आशुतोष आत्राम, कोमल राजगडकर, रवी मेश्राम, महेश पेंदोर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top