Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सुब्बई येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे थाटात उदघाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुब्बई येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे थाटात उदघाटन विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित श्...

  • सुब्बई येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे थाटात उदघाटन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे दिनांक 20 मार्च ते 26 जानेवारी 2022 पर्यंत चालणाऱ्या ग्राम विकासासाठी युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन दिनांक 21 मार्च ला जि. प. उच्च प्राथमिक शाळा मौजा सुब्बई तह. राजुरा जिल्हा चंद्रपूर इथे राजुरा पंचायत समितीचे माजी सदस्य भिमय्या अंगलवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून मा. दादाजी झाडे, मुख्याध्यापक शिवाजी आश्रमशाळा सुब्बई हे होते, शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका सहभागी झालेले आहेत,
या सात दिवसीय शिबिरात स्वच्छता जनजागृती साठी व्याख्याने, श्रमसंस्कार, पथनाट्ये तसेच विविध प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या सात दिवसात जलसंवर्धन, स्वच्छ भारत, गुन्हेगारी, युवकांच्या समस्या, मतदान जनजागृती अशा विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील नामवंत वक्त्यांची मार्गदर्शन होणार आहेत सोबतच रात्री समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
आपल्या उदघाटनपर भाषणात भिमय्या अंगलवार यांनी राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता, जलसंधारण अशा विविध विषयावर जागरूक राहून ग्रामीण भागात जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून अनेक समस्या सुटतील असे प्रतिपादन केले.
या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम वारकड, उपप्राचार्य डॉ आर आर खेरानी, IQAC समन्वयक डॉ मल्लेश रेड्डी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप बोटपल्ले, श्री मारोती आत्राम माजी सरपंच तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या सात दिवसीय शिबिरासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, डॉ. सारिका साबळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ.चेतना भोंगाडे, डॉ. आनंद रायपुरे, डॉ नागनाथ मनुरे, प्रा राजेश चापले आणि बरेचसे प्राध्यापक मंडळी व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत आहेत.
या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सारिका साबळे, प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा. गुरुदास बलकी रासेयो कार्यक्रम अधिकारी आभार प्रदर्शन डॉ नागनाथ मनुरे यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top