Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रसंतांचे कार्य घराघरात पोहोचावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रसंतांचे कार्य घराघरात पोहोचावे चित्रपटाला सहकार्य करण्याची आ.सुधीर मुनगंटीवार यांची मागणी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी मुंबई - र...

  • राष्ट्रसंतांचे कार्य घराघरात पोहोचावे
  • चित्रपटाला सहकार्य करण्याची आ.सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
मुंबई -
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अधिक व्यापकपणे घराघरात पोहोचले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकारने तुकडोजी महाराजांवर आधारित चित्रपटाला सहकार्य करावे, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने काही मुद्द्यांचा समावेश करण्याबाबतच्या विषयावर ते बोलत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विश्वशांतीसाठी मोलाचे कार्य केले. स्वातंत्र्य लढा, राष्ट्रीय एकात्मता, ग्रामविकास आणि मानवता धर्मावर महाराजांनी केलेले कार्य अमूल्य असेच आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील गुरकुंज परिसरातील दासटेकडी येथे महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटनिर्मितीचे काम हाती घेतले आहे. चित्रपटाचा प्रस्तावही त्यांनी दिला आहे. तुकडोजी महाराजांनी समाजाला ग्रामगीता दिली. जीवनाचा मार्ग दाखविला. मानवधर्म शिकविला, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटनिर्मितीच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता द्यावी. चित्रपटाच्या निर्मितीसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी निधीही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top