Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूरात 26 मार्च पासून आमदार चषक 2022
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूरात 26 मार्च पासून आमदार चषक 2022 खुले ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामने धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - दृढ संकल्प स्पोर...

  • गडचांदूरात 26 मार्च पासून आमदार चषक 2022
  • खुले ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामने
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब गडचांदूर व भीमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर च्या वतीने आमदार चषक 2022 भव्य खुले ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामान्यांचे आयोजन दिनांक 26,27, व 28 मार्च ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गडचांदूर च्या पटांगणात  घेण्यात येत असून या सामन्या मध्ये महिला व पुरुष विभागाचे  हरियाणा ,पंजाब, दिल्ली, कर्नाटक, बंगलोर, भुवनेश्वर, आग्रा, यवतमाळ, मुंबई ,गुजरात आदी संघ उपस्थित होणार आहे. पुरुषांच्या गटात विजेत्या संघाला रोख 51 हजार रुपये व सन्मानचिन्ह तर उपविजेता संघाला रोख 31 हजार रुपये रोख पुरस्कार तर तृतीय पुरस्कार रोख 21 हजार रुपये दिला जाईल.
महिला गटातील विजेत्या संघाला रोख 20 हजार रुपये तर उपविजेता संघाला रोख 15 हजार रुपये तसेच तृतीय पुरस्कार रोख 10 हजार रुपये, दिला जाईल,याशिवाय वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट खेळाडू ला पुरस्काराने गौरविण्यात येईल. गडचांदूर शहरात प्रथमच  होत असलेल्या भव्य ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामन्याचे उद्घाटन 26 मार्च ला आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते होणार आहेत, अध्यक्ष स्थानी राजुरा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण धोटे राहील तर स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा सविता टेकाम राहील.
सामन्याच्या यशस्वीते साठी दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब चे अध्यक्ष विनोद तराळे, सचिव विकी मुन भिमसेना बहुउद्देशिय संस्था चे अध्यक्ष नगरसेवक राहुल उमरे,तसेच इतर मेहनत घेत आहेत, क्रीडा प्रेमींनी सामन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top