Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्लोरीयस फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्लोरीयस फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील रमाबाई नग...

  • ग्लोरीयस फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील रमाबाई नगर वार्ड राजुरा, विहिरगाव, धानोरा आणि पांढरपौणी येथे ग्लोरीयस फाउंडेशन राजुराच्या वतीने नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. रामचंद्रराव धोटे प्राथमिक शाळा, रमाबाई नगर, राजुरा येथे तर विहिरगाव, धानोरा आणि पांढरपौणी येथे एकूण १८०० नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. यात प्रत्येक नागरिकांना औषधे सुध्दा देण्यात आले. 
या प्रसंगी डॉ. जेस्सी, डॉ. ज्योएल बाबू, डॉ. निस्से जेरूशा, डॉ. सरोजा व नर्सेस फादर सचिन मुद्देला, फादर आमिन, फादर नितेश, फादर जाॅन स्टान्ली यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल चेकप, आय चेकप, बल्ड शुगर चेकप, बल्ड प्रेशर अशा रुग्णांना मोफत निदान व सेवा पुरविण्यात आल्या. 
 या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, नगरसेवक हरजितसिंग संधू, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अभिजीत धोटे, ग्लोरीयस फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश लोखंडे, विहिरगावचे सरपंच अँड. रामभाऊ देवईकर, इर्शाद शेख, सुधीर लांडे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top