Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मनमोहक आणि आकर्षक आझाद बगीचा लोकसेवेसाठी सज्ज
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनमोहक आणि आकर्षक आझाद बगीचा लोकसेवेसाठी सज्ज शनिवारी होणार भव्य लोकार्पण सोहळा शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर शहराचे...

  • मनमोहक आणि आकर्षक आझाद बगीचा लोकसेवेसाठी सज्ज
  • शनिवारी होणार भव्य लोकार्पण सोहळा
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर शहराचे हृदयस्थळ असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे रूप पालटले असून, भव्यदिव्य, मनमोहक आणि आकर्षक असा बगीचा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आला आहे. त्याचा  लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक २६ मार्च २०२२ रोजी दुपारी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.
आझाद बगीचा हे चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी हक्काचे स्थळ आहे. लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांना हिरव्यागार मोकळ्या वातावरणासह विरंगुळा म्हणून सुविधा अस्तित्वात आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी सुव्यवस्थित व सुसज्ज अशा बगीचाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या बगीच्याच्या सौंदर्यीकरण आणि नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास नेण्यात आले.  
बगिच्यात नेताजी पार्क, स्केटिंग आणि योगा, बॅडमिंटन कोर्ट, चिल्ड्रेन पार्क, ज्योतिबा फुले पार्क, पाथवे, शहीद स्मारक पार्क, फ्लावर गार्डन, गार्डनिंग आणि लॅंडस्कॅपिंग, भव्य मंदिर, आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई, भव्य पार्किंग आणि फूड कोर्ट देखील साकारण्यात आले आहे.
चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मौलाना अबुल कलाम आझाद बगीच्याच्या विकासकामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून कामाला प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हा महापौर राखी कंचर्लावार यांनी नागरिकांसाठी सर्व सोई-सुविधायुक्त आझाद बगीचा कार्यान्वित होईल, याची शाश्वती दिली होती. दिलेल्या शब्द पूर्ण करीत सर्व सोयी आणि सुसज्ज बगीचा लोकाच्या सेवेत लवकरच येत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top