Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 'तरुणांनी शरीर सुदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळावेत' - हंसराज अहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'तरुणांनी शरीर सुदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळावेत' - हंसराज अहीर साखरी येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उदघाटन संपन्न संघर्ष...

  • 'तरुणांनी शरीर सुदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळावेत' - हंसराज अहीर
  • साखरी येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उदघाटन संपन्न
  • संघर्ष युवा विकास मंडळ, साखरी (वा.) येथे मागील २२ वर्षांपासून भरवत आहे क्रिकेट स्पर्धा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
साखरी (वा.) येथे संघर्ष युवा विकास मंडळ तर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'तरुणांनी शरीर सुदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळावेत' असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केले ते सामन्यांच्या उदघाटन समारंभात बोलत होते.
हंसराज अहीर पुढे म्हणाले “क्रिकेटच्या माध्यमातून युवकांनी मैदानी खेळ खेळावेत. त्याचबरोबर आपल्या शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी व्यसनापासून दूर राहावे. त्यामुळे आपला आदर्श घेत येणारी पिढी चांगल्या प्रकारे घडेल.” असे प्रतिपादन त्यांनी उदघाटन प्रसंगी बोलताना केलं.
जिल्हा युवा क्रिडा महोत्सव २०२२ अंतर्गत २४ मार्च ला साखरी (वा.) येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे साखरी वाघोबा करंडक भव्य जिल्हास्तरीय
टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन प्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, पोवनी उपक्षेत्रीय व्यवस्थापक जे.एकम्बरम्, पोवनी एक्स ओपेनकास्ट चे व्यवस्थापक बी.आर. सोलंकी, ग्रामसेवक सौ.वंदनाताई माथनकर, तलाठी साजा पी.बी. भोयर, काशिनाथ पाटील गोरे, तुळशीराम चिकनकर, सौ. ललिता मडावी माजी सरपंच साखरी, अविनाश निमकर, राजू घरोटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
कोरोना काळात मागील दोन वर्षांपासून मैदानी खेळ स्पर्धा बंद पडल्या होत्या. मात्र जसेच या स्पर्धे बद्दल माहिती क्रिकेट खेळणाऱ्या स्पर्धकांना लागली तर जवळपास आतापर्यंत २४ टीमने सहभाग नोंदविला. यात राजुरा, गडचांदूर, चंद्रपूर, वणी, कोरपना, बल्लारशाह ग्रामीण आणि शहरी टीमने सहभाग नोंदवत भाग घेतला आहे. मंडळातर्फे विजेत्या संघाला ३० हजार रुपये रोख तर द्वितीय विजेत्या संघाला २० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यसन मुक्तीचा प्रण घेणाऱ्या दीपक रासेकार यांचा तसेच चंद्रशेखर कावळे, अँड.इंजि. प्रशांत घरोटे, ज्ञानेश्र्वर गरुडे या निवृत्त उत्कृष्ट क्रिकेट पटुंचा सत्कार ही करण्यात आला. 
उदघाटन समारंभाचे संचालन अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांनी केले. क्रिकेट सामन्यांच्या यशस्वितेकरिता सुदर्शन बोबडे, चंद्रशेखर कावळे, वैभव बेसुरवार, अमित निमकर, प्रीतम गालफाडे, सुनील खुजे, राकेश उरकुडे, अनिल गोरे, अक्षय जेणेकर व मंडळातील पदाधिकारी व सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
मागील २२ वर्षांपासून साखरी संघर्ष युवा विकास मंडळ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करीत आहे. त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत संघर्ष युवा विकास मंडळ द्वारे कोरोना काळात जनसेवा, गरजवंतांना अन्नधान्य किटचे वितरण, लसीकरण मोहीम जनजागृती, सामाजिक, शैक्षणिक, ग्राम विकास कार्यातही मोलाचे योगदान देत आहे हे येथे विशेष. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top