Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटेंनी अधिवेशनात मांडल्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या समस्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंनी अधिवेशनात मांडल्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या समस्या विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - अखिल महाराष्ट्र...

  • आमदार सुभाष धोटेंनी अधिवेशनात मांडल्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या समस्या
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघ जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे निवेदन देऊन अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात असलेल्या समस्या सोडविण्यासाठी विनंती केली होती. यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित विभागासमोर प्रश्न उपस्थित करून अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील अडचणी दूर करून त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. 
जिल्हा परिषदेतील शिक्षकांना जिल्हांतर्गत बदली करीत दिनांक ०७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयातील सुचनेनुसार जिल्हा परिषद चंद्रपूरचे दिनांक ०४/०३/२०२२ ला १२४ शाळा/ गावाची यादी अवघड क्षेत्र म्हणुन घोषीत केली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद चंद्रपूरचे दिनांक २०/०५/२०१९ ला ३३२ शाळा/गावाची यादी अवघड क्षेत्र व ६३ शाळा/गाव महिलाकरीता दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्र म्हणुन यादी जाहीर केली होती. त्यानुसारच जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. माहे फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा परिषद चंद्रपूरने ४०७ शाळा/गावाची यादी अवघड क्षेत्र म्हणुन संभाव्य यादी जाहीर केली होती. यावर आक्षेप मागीतले असल्याचे व इतर बाबी अवलोकनार्थ निवेदनात नमूद आहे. तरी माहे फेब्रुवारी 2022 मध्ये 407 गावाची अवघड क्षेत्र म्हणून घोषित केलेली यादी कायम ठेवावी व या व्यतिरिक्त निकष पूर्ण करणारे गावाचा समावेश करावा अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी आमदार धोटे यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top