Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "कॅच द रेन" कॅम्पैन अंतर्गत शिवाजी महाविद्यालयात "पाणी वाचवा" विषयावर निबंध स्पर्धा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"कॅच द रेन" कॅम्पैन अंतर्गत शिवाजी महाविद्यालयात "पाणी वाचवा" विषयावर निबंध स्पर्धा नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे आयोजन ...

  • "कॅच द रेन" कॅम्पैन अंतर्गत शिवाजी महाविद्यालयात "पाणी वाचवा" विषयावर निबंध स्पर्धा
  • नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
नेहरू युवा केंद्र चंद्रपूर, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारे "कॅच द रेन" कॅम्पैन अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालय येथे एनएसएस विभागाच्या सहकार्याने "पाणी वाचवा" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक  डॉ. एस.के. लाटेलवार आणि प्राध्यापक डॉ. एन. मनुरे यांनी केले. स्पर्धेत अनिरुद्ध वानखेडे यास प्रथम, सच्ची केवट हिला द्वितीय तर सागर जयपुरकर यास तृतीय स्थान प्राप्त झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेश खेरानी यांच्या हस्ते विजेत्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाय सर्व सहभागी युवकांना एनएसएस इन्चार्ज गुरुदास बल्की यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यशस्वीतेकरिता नेहरू युवा केंद्र चंद्रपूरच्या राजुरा तालुका प्रतिनिधी कु. प्रिया जावरे यांनी प्रयत्न केले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top