Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन टाटा डंपर हडप करून तुकडे; आरोपी ताब्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाहन व्यवहारात सतर्कता आवश्यक; पोलिसांचे नागरिकांना आवाहन आमचा विदर्भ - चंद्रपूर (दि. ०६ एप्रिल २०२६) -         भद्रावती येथील एका व्यावसायि...
वाहन व्यवहारात सतर्कता आवश्यक; पोलिसांचे नागरिकांना आवाहन
आमचा विदर्भ -
चंद्रपूर (दि. ०६ एप्रिल २०२६) -
        भद्रावती येथील एका व्यावसायिकाची फसवणूक करून दोन ट्रक हडप करून त्यांचे तुकडे करणाऱ्या आरोपींचा घुग्घुस पोलिसांनी यशस्वीरीत्या पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नागपूर येथून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी सध्या छत्तीसगड पोलिसांच्या कोठडीत आहे. फिर्यादी गोविंद अतुल कुंडू, रा. भद्रावती यांच्या मालकीचे टाटा डंपर क्रमांक MH-29-BE-1656 व MH-29-BE-1657 आरोपी साबीर अली सिराजुद्दीन सय्यद, रा. घुग्घुस याने खरेदीच्या बहाण्याने नोटरीद्वारे ताब्यात घेतले होते. मात्र ठरलेली रक्कम न देता त्यांची आर्थिक फसवणूक करून दोन्ही ट्रक लंपास केले.
        या प्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी साबीर अली सय्यद याने हे ट्रक नागपूर येथील जिया उर रहमान उर्फ जिया अन्सारी याच्या ताब्यात दिल्याचे समोर आले. घुग्घुस पोलिसांच्या पथकाने नागपूर येथे छापा टाकून जिया अन्सारी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत, साबीर अली सय्यद यांच्या सांगण्यावरून दोन्ही ट्रक गॅस कटरने कापून त्यांचे तुकडे केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ट्रकचे चेसिस तुकडे, टायर, ऑईल टाकी, फायबर बोनेट व इतर अवशेष जप्त केले आहेत. दरम्यान, मुख्य आरोपी साबीर अली सिराजुद्दीन सय्यद याने छत्तीसगड राज्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती असून तो सध्या तेथील पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात पार पडली. या तपासात सहायक पोलीस निरीक्षक सचिन तायवडे यांच्या सहकार्याने सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस शिपाई परमेश्वर डोईफोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

        पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहन विक्री किंवा भाड्याने देताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. केवळ नोटरीवर विसंबून न राहता अधिकृत कागदपत्रे पूर्ण करणे, खरेदीदाराची पार्श्वभूमी तपासणे, सिबिल पडताळणी करणे तसेच आरटीओकडील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वाहन हस्तांतरित करावे.
#Bhadrawati #Chandrapur #CrimeNews #TruckFraud #PoliceAction #NagpurNews #MaharashtraNews #FraudCase #BreakingNews #PublicAlert #VehicleSafety #RTO #IndiaNews #LatestNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top