Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाढत्या गर्दीतही शिस्तबद्ध सेवा; गॅस एजन्सीचा सकारात्मक प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बिरसा मुंडा गॅस एजन्सीचा आदर्श उपक्रम; ग्राहकांना सावली व पाण्याची सुविधा आमचा विदर्भ - राजुरा (दि. ०६ एप्रिल २०२६) –         अमेरिका, इजराई...
बिरसा मुंडा गॅस एजन्सीचा आदर्श उपक्रम; ग्राहकांना सावली व पाण्याची सुविधा
आमचा विदर्भ -
राजुरा (दि. ०६ एप्रिल २०२६) –
        अमेरिका, इजराईल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीचा अप्रत्यक्ष परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. या जागतिक घडामोडींची झळ सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर पडताना दिसत असून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू आहे. पूर्वी एका मिस कॉलवर सहज उपलब्ध होणारा गॅस सिलेंडर आता मिळवण्यासाठी नागरिकांना भर उन्हात गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. राजुरातील बिरसा मुंडा गॅस एजन्सीसमोर अचानक वाढलेल्या गर्दीचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

       या पार्श्वभूमीवर एजन्सीचे संचालक वाघुजी गेडाम आणि त्यांचे सुपुत्र कृष्णा गेडाम यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी पुढाकार घेतला आहे. एजन्सीसमोर येणाऱ्या ग्राहकांना उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी सावलीत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांसाठी खुर्च्यांची सोय करून दिली आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून थंड पाण्याचे कॅन ठेवण्यात आले असून, उन्हाळ्याच्या तीव्रतेत ही सुविधा ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे. या व्यवस्थेमुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात असून एजन्सीच्या सेवा वृत्तीचे कौतुकही होत आहे.

        सर्वसामान्य नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि कुणीही तळागाळातील व्यक्ती गॅसपासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी घरामध्ये अनावश्यक अतिरिक्त साठा करून ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांनी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करून आवश्यक तेवढाच गॅस घ्यावा, असे आवाहन बिरसा मुंडा गॅस एजन्सीचे संचालक वाघुजी गेडाम यांनी केले आहे.

        मध्यंतरी केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्री तात्पुरती स्थगित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र सध्या परिस्थिती सुधारत असून मागणीनुसार व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. एकूणच, वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बिरसा मुंडा गॅस एजन्सीने केलेली ग्राहकाभिमुख व्यवस्था ही इतरांसाठी आदर्श ठरत असून, संकटकाळातही सेवा देण्याचा सकारात्मक संदेश यातून दिला जात आहे.
#RajuraNews #Chandrapur #GasCylinder #LPGIndia #GasShortage #LocalNews #CustomerService #GoodInitiative #SummerRelief #IndiaNews #PublicService #GroundReport #GasAgency #PositiveNews #BirsaMundaGasAgency #Indangas #waghujigedam #krishnagedam #CommunitySupport #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top