Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दालमिया कंपनीच्या गेटवर मनसेचा आंदोलनाचा इशारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दालमिया कंपनीच्या गेटवर मनसेचा आंदोलनाचा इशारा धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - दालमिया व्यवस्थापनाने लेखी स्वरूपात केलेल...

  • दालमिया कंपनीच्या गेटवर मनसेचा आंदोलनाचा इशारा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
दालमिया व्यवस्थापनाने लेखी स्वरूपात केलेल्या करारानुसार जुन्या मुरली कामगारांना कामावर घेण्याऐवजी कंत्राटदारामार्फत नवीन कामगार कामावर घेतले जात आहे आणि त्याचवेळी नवीन कामगारांना कामावर घेण्याच्या बदल्यात दहा हजार रुपयांची मागणी केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा सचिव प्रकाश बोरकर यांनी गडचांदूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन जुन्या मुरली कामगारांना दहा दिवसांत कामावर न घेतल्यास दालमिया कंपनी गेटवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पाच ते सहा महिन्यांपूर्वी मराठी कामगार सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दालमिया कंपनी गेटसमोर जुन्या मुरली कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी तसेच आजूबाजूच्या गावातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी महिनाभरापासून आंदोलन आणि अन्न त्याग उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने कोरपना तहसीलदार साहेबांच्या कार्यालयात स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत लेखी आश्वासन दिले होते. या संदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मनसेच्या वतीने 17.02.2022 व 28.02.2022 रोजी कंपनी व्यवस्थापकांना दोन निवेदने देण्यात आली, मात्र आजतागायत जुन्या कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही. आता मिळालेल्या माहितीनुसार, काही कंत्राटदारांनी अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात नवीन कामगार घेतले असून, राज्याबाहेरूनही कामगार आणले आहेत. नवीन कामगार ठेवण्यासाठी काही दलालांमार्फत दहा हजार रुपये मागितले जात आहेत.  कंपनीत सुरू असलेला हा पैसे लुटण्याचा गोरख व्यवसाय तात्काळ बंद करण्याबरोबरच जुन्या मुरळी कामगारांना 10 दिवसांत पुन्हा रुजू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा दालमिया कंपनीच्या गेटवर आंदोलनाचा करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top