Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पंचायतराज संस्थेतून महिलांना मिळाली स्वतःची ओळख - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंचायतराज संस्थेतून महिलांना मिळाली स्वतःची ओळख - आमदार सुभाष धोटे बालविकास प्रकल्प कार्यालयाद्वारा पंचायतराज संस्थेतील महिला प्रतिनिधींच्या...
  • पंचायतराज संस्थेतून महिलांना मिळाली स्वतःची ओळख - आमदार सुभाष धोटे
  • बालविकास प्रकल्प कार्यालयाद्वारा पंचायतराज संस्थेतील महिला प्रतिनिधींच्या प्रशिक्षणाचे आयोजन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
बाल विकास प्रकल्प कार्यालय राजुरा द्वारा आयोजित पंचायत राज संस्थेतील महिला प्रतिनिधी चे तालुकास्तरीय प्रशिक्षण व मेळावा कार्यक्रमाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी संकुल राजुरा येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, महिला सक्षमीकरणासाठी स्वतः महिलांनी समोर येणे काळाची गरज आहे. अनेक वर्षाच्या संघर्षांनंतर आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांना प्रगती साधता यावी, नेतृत्व सिध्द करता यावे यासाठीच पंचायतराज व्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आज या संस्थांमधून महिलांनी मोठय़ा प्रमाणावर संधीचे सोने केले असून अनेक महिलांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे ही अभिमानाची बाब आहे असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की महिलांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि अन्य समाजसुधारकांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आनखी प्रगती केली पाहिजे. 
या प्रसंगी संवर्ग विकास अधिकारी किरण कुमार धनवडे,  माजी जिप सदस्या मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदाबाई जेनेकर, निर्मलाताई कुळमेथे, तालुका शहराध्यक्ष तथा माजी नगरसेविका संध्याताई चांदेकर, माजी उपसभापती मंगेश गुरनुले, सौ वैशाली सटाले तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, विस्तार अधिकारी रत्नपारखी यासह राजुरा तालुक्यातील महिला सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top