Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लालबहादूर शास्त्री विद्यालयात सायबर क्राईम बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लालबहादूर शास्त्री विद्यालयात सायबर क्राईम बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस स्टेशन गडचांदूरच्या वतीने कार्यक्रम धनराजसिंह शेखावत - आमचा...
  • लालबहादूर शास्त्री विद्यालयात सायबर क्राईम बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
  • पोलीस स्टेशन गडचांदूरच्या वतीने कार्यक्रम
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
लाल बहादूर शास्त्री विद्यालय गडचांदूर येथे विद्यार्थ्यांना सायबर क्राइम बाबतीत माहिती मिळावी या हेतुने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
गडचांदूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम बाबतीत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ शैक्षणिक कार्यासाठी करावा त्याचा गैरवापर करू नये असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर काळे, लांडे, शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top