Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक फाऊंडेशन तर्फे मॅरेथॉन द्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक फाऊंडेशन तर्फे मॅरेथॉन द्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती रस्ता सुरक्षा संदेश सोबत गावातील २० गरजूना क्रॅश हेल्मेट वाटप धनराजसिंह शेखा...

  • अल्ट्राटेक फाऊंडेशन तर्फे मॅरेथॉन द्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती
  • रस्ता सुरक्षा संदेश सोबत गावातील २० गरजूना क्रॅश हेल्मेट वाटप
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आजच्या धावपळीच्या युगात वाहनाचे प्रमाण वाढले असून यामुळे रस्ता अपघाताचे प्रमाण वाढले असुन त्यामुळे गाडी चालवितानी सडक सुरक्षतेच्या नियमाचे पालन करण्यात यावे, जीवन रक्षा व्हावी यासाठी, अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन तर्फे ए.सी.डब्ल्यु मॅराथॉन आवारपूर तर्फे मॅरॅथॉन दौडचे आयोजन अल्ट्राटेक चे युनिट हेड, श्रीराम पी.एस. व व्यवस्थापक कर्नल दीपक डे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
ही मॅरॅथॉन अन्नपूर्णा मैदान ए.सी.डब्ल्यू. ते आवारपूर बस स्टाप पर्यंत होती. यामध्ये अल्ट्राटेक कॉलनीतील रहिवासी, सभोवतालील गावातील रहिवासी त्यामध्ये पुरूष, महिला व मुलांचा सुध्दा सहभाग होता. या कार्यक्रमाला विशेष करून युनिट हेड, श्रीराम पी.एस., ललीत देवपुरा, सौंदीप घोष, कर्नल दिपक डे व विभाग प्रमुख तसेच आवारपूर, नांदा, बीबी, नोकरी व पालगाव या गावातील सरपंच/उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती.
यामध्ये बँनर, पोस्टर, संगीत द्वारे सडक सुरक्षेचा संदेश देण्यात आला. सर्व सहभाग्यांना टी - शर्ट सुध्दा प्रदान करत गावातील २० गरजू लोकांना क्रॅश हेल्मेट चे वाटप युनिट हेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रश्नमंजुषा द्वारा सडक सुरक्षेचा संदेश देण्यात आला व आवारपूर दौडच्या महिला, पुरुष व बालक वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषक वितरण करण्यात आले.
श्री शिवाजी इंग्लिश स्कूल नांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सडक सुरक्षा वरती संदेश सुद्धा दिला. ग्रामपंचायत आवारपूर यांनी आवारपूर बस स्टॉप वरती सर्व सहभाग्यांना पिण्याच्या पाण्याची व स्वागताची उत्तम तयारी केली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदळे तसेच एडमिन विभागा सोबातच सेक्युरिटी, ई.आर., सेफ्टी, सिव्हिल, ए.बी.पी.एस.स्कुल व मेडिकल सेंटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top