Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून कढोली (...

  • कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून कढोली (बू) येथील शेतकरी सुदर्शन बापूजी बोबडे वय ४५ वर्षे यांनी शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास  विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. राजुरा तालुक्यातील कढोली (बू) येथील शेतकरी सुदर्शन बापूजी बोबडे हे गेल्या तीन-चार नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त होते. कर्जाचा डोंगर आणि नापिकी यामुळे त्यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. तातडीने त्यांना कढोली (बू) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचेवर राष्ट्रीयकृत बँक, सेवा सहकारी पतसंस्था व सेवा सहकारी संस्था या तिघांचे मिळून 3 लाख 50 हजार रुपयाचे कर्ज असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते गेल्या अनेक दिवसापासून निराशेने ग्रस्त होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी विष प्राशन केल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top