Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कुल येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स रा...

  • विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
  • ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कुल येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कलागुण अधिकाधिक विकसित व्हावे या उद्देशाने ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कुल येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनीत बालवैज्ञानिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विज्ञान प्रदर्शनाला पालकांचीही उपस्थिती होती. यावेळी शाळेची केंद्र प्रमुख सौ. शुभांगी धोटे, शाळेचे केंद्र संचालक ॲड. मनोज काकडे, शिक्षिका सौ प्रीती आणि आलिया शेख मॅडम उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाच्या यश्वीतेकरिता शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि सौ. जयश्री मालेकार यांनी मोलाचा वाटा उचलला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top