Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना येथे काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना येथे काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदा...

  • कोरपना येथे काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे निर्देशानुसार कोरपना येथे काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणी करिता नियुक्त मुख्य नोंदणी कर्त्यांची आढावा बैठक तालुका काँग्रेस कॅमेटी चे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
तालुका सदस्य नोंदणी समन्वयक माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले की काँग्रेस पक्षाने प्रथमच डिजिटल पद्धतीने सदस्य नोंदणी सुरू केली असून संपूर्ण पारदर्शक पद्धतीने नवीन नोंदणी केली जाणार आहे. सदस्य नोंदणी मोहिमेत मुख्य नोंदणी कर्त्यांनी आपल्या क्षेत्रातील  नोंदणी करत्यांची निवड करून कोरपना तालुका हा जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी करणारा तालुका म्हणून समोर येईल. यासाठी सर्वांनी संपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे यांनी जिल्ह्यातील सर्व नगर पंचायत क्षेत्रातून कोरपना नगर पंचायत मध्ये सर्वाधिक सदस्य केली जाईल या बाबत उपस्थितांना आश्वस्थ केले. नगर परिषद गडचांडुर चे गटनेता विक्रम येरणे यांनी संपूर्ण सदस्य नोंदणी प्रक्रिया समजावून सांगितली.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती संभाजी कोवे, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील मालेकर, मनोहरराव चन्ने, गणेश गोडे,  तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश लोखंडे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष उमेश राजूरकर, नगर पंचायत उपाध्यक्ष  इस्माईल शेख, नगरसेवक नितीन बावणे, निसार शेख, रोशन आस्वले, आदिवासी योजना प्रकल्प सदस्य विलास मडावी,  प्रशांत लोढे, सचिन मालेकर, स्वप्नील माणूसमारे, सुनील कोहचाडे, रोशन मरापे, अनिल गोंडे उपस्थित होते. संचालन गणेश गोडे तर आभार प्रदर्शन निसार शेख यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top