आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरून नेले. ही घटना मंगळवार (दि. १५) रोजी मूर्ती येथे उघडकीस आली.
नागोराव भगवान पिपरे यांनी याप्रकरणी विरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागोराव पिपरे हे आपल्या पत्नीच्या उपचाराकरिता पत्नी सोबत नागपूरला गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले नगदी 20 हजार रुपये, एका बुकात ठेवलेले 5 हजार रुपये, 6 ग्रँमचे एक सोन्याची आंगठी अंदाजे किंमत 10 हजार रुपये व दोन नग सोन्याचे कर्णफुले 4 ग्रँम अंदाजे किंमत 5 हजार रुपये असा एकुण 40 हजाराचा माल अज्ञात चोरटयांनी चोरून नेला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि १८६० कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला. समोरील तपास पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.