- चितळ शिकार प्रकरणातील अडीच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपींना पकडण्यात वन विभागास यश
- राजुरा वन परिक्षेत्राची कामगीरी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
दिनांक 23/08/2019 रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरून सिंधी गावात चितळाचे मासाचे विल्हेवाट लावत असल्याचे माहिती वन अधिकाऱ्यांना लागली. त्यांना पकडण्याचा पर्यंत केला असता वनविभागाचे अधिकारी येण्याचा सुगावा लागताच बापूजी सिताराम कोडापे रा. सिंधी यांचे घरी धाड टाकले असता, मौक्यावरून बापूजी सिताराम कोडापे रा. सिंधी, साईनाथ बापूजी कोडापे रा. सिंधी व संजय मारोती कोडापे रा. सिंधी सदर आरोपी मोक्यावरून पसार झाले होते. वन अधिकाऱ्यांनी मोक्यावरून चितळाचे मांस, चितळाचे अवयव व इतर साहित्य जप्त करून अपराध क्रमांक 227/16 दिनांक 23/08/2019 अन्वये वन्यजिव (संरक्षण) अधिनीयम 1972 चे कलम 2,9,39,50 व 51 नुसार वनगुन्हा जारी केला.
त्यानंतर दिनांक 24/08/2019 रोजी सदर आरोपींचा शोधात सिंधी येथे आरोपीच्या राहते घरी धाड टाकले असता, सदर वनगुन्हयातील आरोपी बापूजी सिताराम कोडापे यास ताब्यात घेण्यात आले. व अटक करून राजुरा न्यायालयात हजर करून (E.C.R.) वन कोठडी घेण्यात आले.
सदर वनगुन्हयात 2 वर्षे 8 महिने पासुन फरार असलेले आरोपी साईनाथ बाजुजी काडापे, वय 39 वर्षे रा. सिंधी व संजय मारोती कोडापे, वय 42 वर्षे रा. सिंधी यांना दिनांक 21/03/2022 रोजी पहाटेच्या वेळी सिंधी गावात धाड टाकुन त्यांचे राहते घरून ताब्यात घेण्यात आले. सदर कार्यवाही उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात, उपविभागीय वनअधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांचे नेतृत्वात विहिरगाव क्षेत्र सहाय्यक एन.के. देशकर, राजुरा क्षेत्र सहाय्यक पि.आर. मत्ते, वनपाल ईश्वर रूद्रशेटटी, वनरक्षक कु. सुलभा उरकुडे, वनरक्षक सनिल मेश्राम, वनरक्षक संजय सुरवसे यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.