Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा वन परिक्षेत्रात जागतिक वनदिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा वन परिक्षेत्रात जागतिक वनदिन साजरा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदला...

  • राजुरा वन परिक्षेत्रात जागतिक वनदिन साजरा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे, हा वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करताना आणि धोरण ठरवताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची खात्री या मंचावरून एकत्रितपणे करता येईल. यासाठी वन दिवस साजरा केला जातो. त्यानुसार, राजुरा परिक्षेत्रात जागतिक वनदिन साजरा करण्यात आला. वनपरिक्षेत्र कार्यालयात व राजुरा परिसरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले. जागतिक वनदिनानिमित्त राजुरा परिक्षेत्रात शिवाजी विद्यालय, राजुरा येथिल शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद यांच्या समवेत राजुरा वनपरिक्षेत्र कार्यालयापासुन राजुरा शहराच्या मुख्य रस्त्याने जोगापुर गेट पर्यंत मोटार सायकल व सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना जोगापुर गेट ते जोगापुर मंदिर 8 किमी अंतरापर्यंत वनभ्रमंती व जंगल सफारी करण्यात आली. तसेच जोगापुर मंदिर परिसरात उपविभागीय वनअधिकारी ए.बि.गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, शिवाजी विद्यालयचे शिक्षक विरुटकर सर यांनी आपले मनोगतातुन विद्यार्थ्यांना वन व वन्यजिवाबाबत मार्गदर्शन करण्यात येवुन वन व वन्यजिवाविषयी जनजागृती करत विद्यार्थ्यांना वन व वन्यजीवांचे महत्व पटवुन दिले. सदर कार्यक्रमास राजुरा वनपरिक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top