Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदुरात पार पडला मुस्लिम विवाह परिचय मेळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदुरात पार पडला मुस्लिम विवाह परिचय मेळावा एकूण २५ जणांनी मेळाव्यामध्ये परिचय दिला धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - म...

  • गडचांदुरात पार पडला मुस्लिम विवाह परिचय मेळावा
  • एकूण २५ जणांनी मेळाव्यामध्ये परिचय दिला
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मुस्लिम जमात गडचांदूरच्या वतीने लक्ष्मी मंगल कार्यालय गडचांदूर येथे मुस्लिम सामूहिक परिचय मेळावा नुकताच पार पडला. पहिल्यांदाच अशा प्रकारचा मेळावा घेण्यात आला असून एकूण २५ जणांनी मेळाव्यामध्ये परिचय दिला.
सदर मेळाव्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील मुस्लिम नागरिकांची उपस्थिती होती. परिचय मेळाव्यामुळे विवाह करणाऱ्यांना जोडीदार निवडण्यास मदत होईल, असे कोरपना पंचायत समितीचे माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान यांनी मेळाव्यादरम्यान म्हटले. यावेळी मंचावर सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रफिक निजामी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top