Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नांदा येथे अवघ्या दोन तासात 50 युवकांनी केले रक्तदान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा येथे अवघ्या दोन तासात 50 युवकांनी केले रक्तदान शिवसाम्राज्य युवक मंडळ यांनी केले होते भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन धनराजसिंह शेखावत - आ...

  • नांदा येथे अवघ्या दोन तासात 50 युवकांनी केले रक्तदान
  • शिवसाम्राज्य युवक मंडळ यांनी केले होते भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
शिवसाम्राज्य युवक मंडळ नांदा यांचा वतीने सांस्कृतीक भवन नांदा येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रसंगी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अधिकारी कर्नल डे, सतीश मिश्रा, सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे डॉ. कल्याण, रत्नाकर चटप, पुरुषोत्तम निब्रड, मुर्लीधर बोडखे उपस्थित होते. युवकांनी असे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन समाजात आपला आदर्श निर्माण करावा. आम्ही नेहमी आपल्या सहकार्य साठी पुढे येवू असे प्रतिपादन कर्नल डे यांनी केले. याप्रसंगी रक्तदान करणाऱ्या युवकांना 30 हेल्मेट देण्यात आले. रक्तदान शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवघ्या दोन तासात 50 युवकांनी रक्तदान केले. यावेळी युवक मंडळाचे सामान्य रुग्णालय चंद्रपूर रक्तपेढी तर्फे शिल्ड देवून सत्कार करण्यात आला. सामान्य रुग्णालय चंद्रपूर रक्तपेढी यांचा चमू ने विशेष सहकार्य केले. या रक्तदान शिवीराच्या यशस्वितेकरिता नांदा येथील शिवसाम्राज्य युवक मंडळच्या युवा सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top