Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नपच्या करावर लावण्यात आलेला २% दंड रद्द करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नपच्या करावर लावण्यात आलेला २% दंड रद्द करा विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांची नगराध्यक्षांकडे मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी ...

  • नपच्या करावर लावण्यात आलेला २% दंड रद्द करा
  • विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांची नगराध्यक्षांकडे मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
संपूर्ण देशात मागील दोन वर्षा पासून कोरोनाने हाहाकार माचवलेला आहे. शासनाला शेवटी कोरोना आटोक्यात आणण्याकरिता संपूर्ण देशात लॉक डाऊन लावावे लागले. त्यात शेतकरी, मजूर, लहान मोठे व्यापारी सर्वांचे रोजगार ठप्प झाले होते. अश्या परिस्थितीत सर्वांची आर्थिक परिस्थिती ढासळली. बरेच लोक कर्जबाजारी झाले. त्याच दरम्यान बरेच लोक नगर परिषदेचा मालमत्ता कर (टॅक्स) सुद्धा भरू शकले नाही. या दरम्यान अनेक सामाजिक संस्थांनी तसेच विविध पक्षांनी सर्वोतोपरी मदत केली. त्याच प्रमाणे नगर परिषद कडून किमान बीपीएल धारकांचे कर (टॅक्स) माफ करण्याची मागणी नगर परिषद चे विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी नगराध्यक्ष यांना पत्राद्वारे केली आहे.
मात्र या पात्राची नगराध्यक्षांनी त्याकुठलीही दखल घेतली तर नाही उलट सरसकट सर्वांना थकलेल्या मालमत्ता करावर प्रति माह २% दंड वसूल करण्याचा निर्णय सभागृहात घेतला. हा पूर्णपणे चुकीचा असून लोकांना धडकी सोडणारा आहे. आताच कोरोनातून कसेबसे बाहेर पडत असून हा लावलेला २% दंड हा आर्थिक बजेट बिघडविणारा आहे. अशा या निर्णयामुळे आमजनतेत नगर परिषद विषयी असंतोष पसरत असून सदरचा दंड रद्द करण्याचा विषय तात्काळ सभेला घेऊन रद्द करण्याची मागणी भाजपचे विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली असून याकडे नगराध्यक्ष काय निर्णय घेतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top