- गडचांदूर नगर परिषद हद्दीतील बंद पडलेली मंजूर कामे सुरू करा
- दिलेल्या कालावधीत काम न करणाऱ्या ठेकेदाराकडून दंड वसूला
- नगरसेवक अरविंद डोहे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी
- अन्यथा जनतेला सोबत घेऊन नप वर मोर्चा काढून आंदोलन व उपोषण करण्याची तयारी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नगर परिषद गडचांदूर हद्दीतील बंद असलेले मंजूर कामे मंजूर झाली पण थोडेसे काम सुरू करून अनेक कामे बंद पडलेली आहे. असे थकीत पडलेली कामे तात्काळ चालू करण्याची मागणी नगरसेवक अरविंद तुकाराम डोहे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद गडचांदूर याना एका निवेदनाद्वारे केली आहे. अरविंद डोहेंनी दिलेल्या कालावधीत काम न करणाऱ्या ठेकेदाराकडून दंड वसूल करण्याचीही मागणी केली आहे.
नगर परिषदमधे विविध फंडातून मंजूर असलेले अनेक कामे बंद पडलेली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या परिसरातील काम मागील दीड वर्षांपूर्वी ठेकेदाराला कामाचा कार्यदेश देण्यात आला व उदघाटन ही करण्यात आले. काही महिन्यांनी त्या ठिकाणी खोदकाम करून कॉलम उभे करण्यात आले. परन्तु मागील दोन महिन्यांपासून काम पूर्णता बंद पडले आहे. सर्वे नं. 367, बुऱ्हाण लेआऊट मधील ओपन स्पेस संरक्षण भिंतीचे व सौंदरीकरण कामाचे मागील दीड वर्षापूर्वी ठेकेदाराला कामाचा कार्यदेश देण्यात आला. तिथेही कामाला सुरुवात केले परन्तु काही महिन्यांपासून ते काम पूर्णता बंद पडले आहे. सर्वे नं. 366/1, डोहे लेआऊट मधील ओपन स्पेस संरक्षण भिंतीचे व सौंदरीकरण कामाचे मागील दीड वर्षापूर्वी ठेकेदाराला कामाचा कार्यदेश देण्यात आला व तिथेही कामाला सुरुवात केले, पण अर्धवट काम करून आता दोन महिन्यांपासून ते काम पूर्णता बंद पडले आहे.
तसेच सर्वे नं. 104 मधील ओपन स्पेस च्या संरक्षण भिंतीचे व सौंदरीकरण कामाचे ठेकेदारांना एक वर्षांपूर्वी कार्यदेश देण्यात आले परन्तु त्या कामाला अजूनही सुरुवात पणे करण्यात आले नाही. प्रभाग क्र. 2, मुसा लेआऊट मधील बोरवेल मंजूर असून त्या कामाचे कार्यादेश मागील अंदाजे 1 वर्षापूर्वी देण्यात आले आहे, परन्तु अजूनपर्यंतही त्या ठिकाणी बोरवेल मारण्यात आलेली नाही. सन 121/1 व 2 मधील ओपन स्पेस सौंदरीकारण व संरक्षण भिंतीच्या कामाचे मागील दीड वर्षा पूर्वी ठेकेदारांना कार्यदेश देण्यात आले व कामाचा कालावधी 90 दिवस देण्यात आले असताना तेथील कामे अतिशय मंदगतीने चालू आहे अजूनही ते पूर्ण झालेले नाही. मार्केट मधील नालीचे बांधकामाचे ठेकेदारांना कार्यदेश देते वेळी कामाची कालावधी देण्यात आली व ती कालावधी पूर्ण झाली असून अजूनही काम पूर्ण झालेले नाही आहे. मागील महिन्यापूर्वी 2.10 कोटी रुपये रोड, नाली बांधकामाचे ठेकेदाराला कार्यदेश देऊन उदघाटन करण्यात आले. परन्तु अजूनही कामाला सुरूवात करण्यात आले नाही.
मंदावलेली वरील कामे तात्काळ सुरु करण्यात यावी व दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराकडून दंड वसूल करण्यात यावे अन्यथा आम्हाला नगर परिषद वर मोर्चा/आंदोलन/उपोषण सारखे आंदोलन करावे लागेल असे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा प्रशासक अधिकारी नगर पालिका विभाग, चंद्रपूर, नगराध्यक्ष नगर परीषद गडचांदुर यांना माहितीस माहीतीस सादर केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.