Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल राजुराचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल राजुराचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - विधाता फाउंडेशन राजुरा द्वारे ...

  • ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल राजुराचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
विधाता फाउंडेशन राजुरा द्वारे संचालित रामनगर कॉलनी येथील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल येथे शाळेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षपूर्ती उत्सव सोहळा निमित्त शाळेमध्ये मुलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुलांच्या पाल्यांकरिता सुद्धा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.  शाळेचा वर्षपूर्ती सोहळा निमित्य आयोजित समारोप कार्यक्रमात शाळेकरिता शहराच्या मोक्यावर इमारत उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील प्रतिष्ठित व्यापारी अडानिया दाम्पत्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून व्यवस्थापकीय संचालक संजय पिंपळेशेंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सल्लागार सदस्य संदीप मालेकर,  व सौ जयश्री मालेकर यांची विशेष उपस्थिती होती. केंद्र संचालक ॲड. मनोज काकडे यांनी शाळेच्या प्रगतीची माहिती सर्व पालक वर्गाला करून दिली. तसेच शाखाप्रभारी सौ शुभांगी धोटे, सूत्रधार मोहन धोटे, समन्वयक सौ. बेनझीर अजानी या उपस्थित होत्या. संचालन सौ. शुभांगी धोटे व सौ प्रीती चन्ने यांनी केले तर आभार कुमारी आलिया शेख यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थीगण उपस्थित होते. पालकांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top