Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पक्षाघात व कॅन्सरग्रस्तांना धनादेशाचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पक्षाघात व कॅन्सरग्रस्तांना धनादेशाचे वितरण विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - शेतकरी कल्याण निधी ...

  • आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पक्षाघात व कॅन्सरग्रस्तांना धनादेशाचे वितरण
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने क्षेत्रातील पक्षाघात व कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे आर्थिक मदत करण्यात आली. 
या अंतर्गत शंकर देवाजी पिपरे (पक्षघात)  सोमनाथपुर् वार्ड राजुरा, रुपेश सुधाकर धोटे (कॅन्सर), पांढरपौनी ता. राजुरा, अविनाश मुर्लीधर वाडगुरे (कॅन्सर) पिंपळगांव ता. कोरपना यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे कोरपना तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, नगराध्यक्षा सविता टेकाम, माजी जि.प.सदस्य उत्तमराव पेचे, सुरेश पा. मालेकर, विनोद झाडे, रेखा घोडाम यास लाभार्थी कुटुंबिय उपस्थीत होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top