Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वंचित बहुजन आघाडीचा अनोखा उपक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वंचित बहुजन आघाडीचा अनोखा उपक्रम गतिरोधकाला मारले पांढरे पट्टे विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - मुख्य मार्गावरील गतिरोधक चाल...

  • वंचित बहुजन आघाडीचा अनोखा उपक्रम
  • गतिरोधकाला मारले पांढरे पट्टे
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
मुख्य मार्गावरील गतिरोधक चालकांना दिसत नसल्याने या गतिरोधका जवळ अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. याची दखल घेत काल वंचित बहुजन आघाडी राजुरा तालुक्याच्या वतीने श्रमदान करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष भूषण फूसे यांच्या पुढाकाराने जोगापूर गेट जवळील गतिरोधकाना पांढरा रंग मारण्यात आला. स्पष्ट दिसत नसल्याने वाहतुकीस अडचण ठरत असलेले गतिरोधक वाहन चालकांना दिसून त्यांना वाहनांवर आवर घालत वेगावर नियंत्रणास मदत होईल व होणाऱ्या अपघातांना पूर्णविराम लागेल. 
या गतिरोधकांमुळे खूप वाटसरू ना अपघाताला सामोरे जावे लागत होते. यामुळे या रस्त्या वरील रहदारी बघता रात्रीच्या वेळी चालकांना काहीच दिसत नसल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत होता. याची दखल घेत तिथे जाऊन गतिरोधकाला पांढरा रंग मारण्यात आला. तसेच त्यानंतर शिवाजी नगर येथील मुख्य मार्गावरील गतिरोधकाना रंग लावण्यात आले. जेणेकरून अपघात होऊ नये. तसेच चालकांना गतिरोधक दिसल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल व अपघात टळेल. 
यावेळी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भूषण फूसे, जिल्हा सचिव तथा राजुरा तालुका निरीक्षक रमेश लिंगमपल्लीवार, प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, जिल्हा सदस्य महेंद्रसिंग ठाकूर, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे,  तालुका महासचिव रविकिरण बावणे,  तालुका उपाध्यक्ष सुभाष रामटेके, तालुका कार्याध्यक्ष सुभाष हजारे आदी उपस्थित राहून गतिरोधकांना पांढरा रंग लावण्यास सहकार्य केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top