Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एसटी कर्मचाऱ्यांना श्रमिक एल्गार चा आधार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एसटी कर्मचाऱ्यांना श्रमिक एल्गार चा आधार एसटी कर्मचाऱ्यांनी मानले श्रमिक एल्गार चे आभार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - एसटी कर्मच...

  • एसटी कर्मचाऱ्यांना श्रमिक एल्गार चा आधार
  • एसटी कर्मचाऱ्यांनी मानले श्रमिक एल्गार चे आभार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
एसटी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र शासनात विलागिकरण करण्यासाठी मागील 106 दिवसापासून जिल्ह्यात आंदोलन सुरू असून महाराष्ट्र शासनाने आंदोलनकर्त्यांना अजूनही दाद दिली नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून अनेक कर्मचारी शहीद झाले. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू न केल्याने कर्मचाऱ्यांना कुटुंब जगविणे कठीण होत आहे या जाचाला कंटाळून अनेक कर्मचारी शहीद झाल्याने दुखवटा आंदोलन सुरू करण्यात आला. याची दखल श्रमिक एल्गार संघटनेने  घेत गरजू कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवून दिले. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ॲड. फरहात बेग, श्रमिक एल्गार चे अध्यक्ष प्रवीण चिचघरे, उपाध्यक्ष घनशाम मेश्राम, ॲड. कल्याण कुमार यांनी मार्गदर्शन केले. करून किट वाटप केली व शुभेछ्या दिल्या यावेळी सर्व कर्मचारी आभार मानले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top