Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिवसेना राजुरा शहर प्रमुख निलेश गंपावार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना राजुरा शहर प्रमुख निलेश गंपावार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा बामनवाडा येथील अनाथ आश्रमात ब्लॅंकेट वितरित  आमचा विदर्...

  • शिवसेना राजुरा शहर प्रमुख निलेश गंपावार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
  • बामनवाडा येथील अनाथ आश्रमात ब्लॅंकेट वितरित 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रिदाला धरून शिवसेना राजुरा शहर प्रमुख निलेश गंपावार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राजुरा शहरालगत बामनवाडा येथील अनाथ आश्रमातील मुलांना ब्लॅंकेटचे वाटप करून सामाजिक संदेश देण्यात आला. राजुरा शहर शिवसेनेच्या वतीने वेळोवेळी अतिशय उत्तम सामाजिक उपक्रम नेहमी राबवण्यात येत असतात. याप्रसंगी राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, राजुरा शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव चापले, शिवसेना तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना शहर समन्वयक बबलू चव्हाण, मोनू सूर्यवंशी, आशिष गंपावार, श्रीनाथ बोलमवार, सतीश कायडिंगे, सुरज सोमलवार, रवी पेरका, असिफ शेख, नासिर शेख, शुभम आत्राम प्रफुल करनेवार, इस्माईल खुरेशी, बाळूभाऊ, राहुल मेडपल्लीवर, आशिष चौधरी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top