Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 'एक दिन एक हिजाबी प्रधानमंत्री बनेगी...' हिजाबच्या वादात असदुद्दीन ओवेसींचे ट्विट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'एक दिन एक हिजाबी प्रधानमंत्री बनेगी...' हिजाबच्या वादात असदुद्दीन ओवेसींचे ट्विट आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नवी दिल्ली - कर्नाट...

  • 'एक दिन एक हिजाबी प्रधानमंत्री बनेगी...'
  • हिजाबच्या वादात असदुद्दीन ओवेसींचे ट्विट
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नवी दिल्ली -
कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादाचे पडसाद संपुर्ण देशात उमटत आहे. या प्रकरणावरुन राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करत आहे. दरम्यान हे सर्व प्रकरण सुरू असताना एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एक भाष्य केले आहे. एकदिवस एक हिजाबवाली महिला देशाची पंतप्रधान बनेल. असे ट्विट ओवेसी यांनी केले आहे.
कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरुन वाद सुरू आहे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हिजाबची चर्चा सुरू आहे. सध्या या प्रकरणी न्यायालयाने तात्काळ कोणताही निर्णय देण्यास नकार दिला आहे. त्यातच आता ओवेसी यांनी ट्विट करत एकदिवस हिजाबवाली महिला पंतप्रधान होईल असे भाकित केले आहे.

हिजाबवाली महिला बनेल पंतप्रधान - ओवेसी
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "'इंशा' अल्लाह एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला देशाची पंतप्रधान बनेल." ओवेसींनी ट्विट सोबत एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणत आहे की, हिजाब घालून आपल्या मुली शाळेत, कॉलेजात जाईल, कलेक्टरही बनेल, बिझनेस मॅनही बनेल, एसडीएमही बनेल आणि या देशात एक दिवस मुलगी हिजाब घालून पंतप्रधान देखील बनेल. असा व्हिडिओ ओवेसींनी पोस्ट केला आहे.

संविधान देतो हिजाब घालण्याचा अधिकार
यापूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाब वादात पुट्टास्वामींच्या निकालाचा संदर्भ दिला होता. ओवेसी म्हणाले होते की, भारताचे संविधान तुम्हाला चादर, निकाब किंवा हिजाब घालण्याचा अधिकार देते. पुट्टास्वामींचा न्यायनिवाडा तुम्हाला हे करण्याची परवानगी देतो. ही आपली ओळख आहे. ज्या मुलीने त्या मुलांना उत्तर दिले त्या मुलीला मी सलाम करतो, घाबरण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशमधील एका निवडणूक सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले होते की, कोणतीही मुस्लिम महिला कोणत्याही भीतीशिवाय हिजाब घालू शकते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top