शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
बिनबा गेट येथील शांतीधामच्या विकासासाठी ३० लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. आज शनिवारी शांतीधाम समीतीच्या वतीने बिनबा गेट येथील शांतीधाम येथे कार्यालय व इमारत बांधकामाच्या भुमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. या प्रसंगी माजी खासदार नरेशबाबू पुगलीया, मनपाचे स्थायी समीती सभापती संदिप आवारी, मौक्षधाम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार, सुरेंद्र खजानजी, दरबारजी, मनपा नगर सेवक अशोक नागापुरे, स्वीकृत नगर सेवक देवेंद्र बेले आदिंची उपस्थिती होती.
शांतीधाम समीतीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून बिनबा गेट यथील मुख्य शांतीधामच्या विकासासाठी प्रयत्न केल्या जात आहे. यात काही अंशी त्यांना यशही आले आहे. त्यांच्या या कार्यात लोकप्रतिनिधी म्हणून माझेही योगदान राहणार आहे. या शांतीधाममध्ये हिंदू परंपरे नूसार अंत्यविधी करण्यासाठी चांगल्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्या तरी येथे आणखी काम करण्याची गरज आहे. अंत्यविधी करिता येणा-या नागरिकांच्या सोयीच्या दिशेनेही येथे काम करण्याची आवश्यकता आहे. माजी खासदार नरेशबाबू पुगलिया हे सुद्धा नेहमी या शांतीधामच्या विकासाठी प्रयत्नशील राहले आहे. त्यांच्या माध्यमातून येथे निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने या शांतीधामच्या मासीक देखरेखीची जबाबदारी घ्यावी याबाबात आपण आयुक्तांना सांगणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. येथील विकास कामासाठी आपण ३० लक्ष रुपये देणार असून या निधीतून येथे अत्यंविधी करिता येणा-या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विकास कामे केल्या जातील असेही ते
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.