Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना नगरपंचायत वर काँग्रेसच्या झेंडा नगराध्यक्ष पदी सौ. नंदा विजयराव बावणे दुसऱ्यांदा विराजमान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना नगरपंचायत वर काँग्रेसच्या झेंडा नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदी सौ. नंदा विजयराव बावणे दुसऱ्यांदा विराजमान उपाध्यक्ष पदी ईस्माइल शेख बा...

  • कोरपना नगरपंचायत वर काँग्रेसच्या झेंडा
  • नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदी सौ. नंदा विजयराव बावणे दुसऱ्यांदा विराजमान
  • उपाध्यक्ष पदी ईस्माइल शेख
  • बारा विरुद्ध पाचच्या फरकाणे विजय संपादण 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
आज कोरपना नंगर पंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यपदाची निवडणुक घेण्यात आली त्या मध्ये काँग्रेसच्या सौ. नंदाताई बावणे व उपाध्यक्ष पदी इस्माईल शेख यांची बारा विरुद्ध पाच अश्या फरकाणे विजय संपादण करुण नगरपंचायत वर  काँग्रेस चा झेंडा फडकवण्यात आला.
या वर्षी झालेल्या नगर पंचायतच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला, मात्र त्यांची निराशा झाली, विजय बावणे यांच्या नेतृत्वाला नागरिकांनी कौल दिला. विजय बावणे यांचे चिरंजीव नितीन बावणे यानी प्रथमच निवडणूक लढवली, काकांना पराभूत करून विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 12 जागेवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले. भाजप ला 4 तर शेतकरी संघटनेला एका जागेवर समाधान मानावे लागले.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय बावणे यांच्या नेतृत्वाखाली नगर पंचायत निवडणूक लढवून घवघवीत यश मिळवले. नगराध्यक्ष पदी सर्वसाधारण महिला साठी राखीव असल्याने नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदी सौ. नंदा विजयराव बावणे दुसऱ्यांदा विराजमान झाल्या तर उपाध्यक्ष पदी ईस्माइल शेख हे विराजमान झाले आहे. नंदाताई 2016 मध्ये नगर पंचायतच्या प्रथम अध्यक्षा बनल्या होत्या. हे विशेष.
1962 पासून कोरपना शहरात बावणे घराणे चे वर्चस्व प्रस्थापित झाले आहेत,1962 मध्ये कोरपना ग्राम पंचायत चे प्रथम सरपंच म्हणून विजय बावणे यांचे वडील स्व. चिंतामणराव बावणे यांनी कार्य केले. त्या नंतर विजय बावणे यांनी सरपंच पद भूषविले. 2016 मध्ये ग्रामपंचायत चे रूपांतर नगर पंचायत मध्ये झाले प्रथम नगराध्यक्ष चा मान विजय बावणे यांच्या पत्नी सौ. नंदाताई बावणे यांना मिळाला. यावर्षी पुनश्च सौ. नंदाताई बावणे व पुत्र युवा नेते नितीन बावणे यांनी विजय मिळवून नगरपंचायत मध्ये प्रवेश केला आहे.
कोरपना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहून विकास कामे केली जाईल. अशी ग्वाही काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयराव बावणे यांनी दिली आहे. शहरातील मतदारांनी टाकलेल्या विश्वास ला तडा जाऊ देणार नाही असेही ते म्हणाले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top