Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय अक्षर वाड्मय पुरस्कार २०२१ जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय अक्षर वाड्मय पुरस्कार २०२१ जाहीर 30 एप्रिल वर्धापन दिनी होणार पुरस्काराचे वितरण धनराजसिंह शेखावत ...

  • अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय अक्षर वाड्मय पुरस्कार २०२१ जाहीर
  • 30 एप्रिल वर्धापन दिनी होणार पुरस्काराचे वितरण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी साहित्य निर्मितीसाठी पुरस्कार देण्यात येते. सन २०२१ अक्षर  वाडमय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट काव्यसंग्रह लेखनाचा पुरस्कार "बिन चेहर्याचे कभिन्न" तुकडे लेखक अक्षय शिंपी मुंबई यांना घोषित करण्यात आला. कथा संग्रहासाठी "परतीचा प्रवास" लेखक राजेंद्र भोसले सोलापूर यांना तर डॉ. स्मिता निखिल दातार, मुंबई लिखित "चौकोनाचा पाचवां कोन" या कादंबरीला उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार देण्यात आला. सोबतच इतर गद्य लेखनात लेखक रवींद्र जवादे मूर्तिजापूर यांच्या "गायी गेल्या राना" या साहित्यकृतीला पुरस्कार देण्यात आला आहे. १५०० रु. रोख, स्मृतिचिन्ह, मानवस्त्र व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर चटप यांनी नुकतिच राजुरा येथे सदर पुरस्काराची घोषणा केल्याची माहिती संयोजक चंदु झुरमुरे यांनी दिली. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे डॉ. किशोर कवठे, मनोज बोबडे, अविनाश पोईनकर, एड. दीपक चटप, राजेश देवाळकर, राम रोगे, उमेश पारखी, प्रवीण तूरानकर, प्रकाश काळे आधी पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहे. गेल्या दहा वर्षांपासून अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान सामाजिक साहित्य कला शैक्षणिक आदी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठान पुरस्कार देत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top