Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इन्फंट कान्व्हेंट चे ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इन्फंट कान्व्हेंट चे ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - इन्फंट जिजस सोसायटी राजुरा ...

  • इन्फंट कान्व्हेंट चे ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा चे ७ विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व सीबीएसई शाखेचे विद्यार्थी आहेत. यात इयत्ता आठवी चा सुजल परसुटकर, इयत्ता सहावीचे अलेश देठे, सोहम गट्टूवार, कु. रांची कांबळे, अर्णव पोटे, अदिती ताजने, अथर्व चचारकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top