- नांदा येथील रद्दबातल जुने सरकारी स्वस्त धान्य दुकान महिला बचत गटाला चालवण्याकरीता द्यावे
- नांदा ग्रामवासी व मनसेची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
चार ते पाच वर्षापासून नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानाला घेऊन गावातील काही लोकांच्या वतीने वाटपामध्ये गैरप्रकार धान्याची अवैद्य वाटप शिधा पत्र धारकाकडून पी ओ एस वर अंगठा लावून घेणे परंतु धान्य न देणे आधार कार्ड अद्ययावत करावयाची सांगून शिधा पत्रिका धारकाकडून अंगठा घेणे शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य न देणे या प्रकारच्या स्वरूपाच्या आरोपांना घेऊन या सबबीखाली अनेक तक्रारी त्याअन्वये पुरवठा आयुक्त नागपुर यांच्या आदेश दिनांक 30 नोव्हेंबर 2019 रोजी आयुक्तांच्या निर्देशांनुसार येथील किसन गोंडे यांच्या कडून चालविण्यात असलेले सरकारी स्वस्त धान्य दुकान रद्द करण्यात आले व शेजारील गावातील बचत गटाला संलग्नित चालविण्याकरिता देण्यात आले सदर बचत गटाचे माध्यमातून सरकारी स्वस्त धान्य दुकान व्यवस्थितरीत्या सुरू असताना व कोणत्याही प्रकारची तक्रार बचत गटाच्या संबंधाने नसताना कोरपना तहसीलदार यांनी राजकीय दबावाखाली व नियमबाह्य मार्गाचा अवलंब करून नांदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान हे आसन येतील सरकारी स्वस्त धान्य दुकाना ला संलग्नित करण्याची कारवाई केली हे चुकीचे असून यासंदर्भात गावकऱ्यांमध्ये विरोध आहे जाहीरनामा लागेपर्यंत सध्या असलेले आदर्श महिला परिवार बचत संघ या गटाला दुकान कायम ठेवण्यात यावे तहसीलदारांनी केलेली कारवाई चुकीची असून हे गावकऱ्यांना मान्य नाही त्यांचे आदेश रद्द करण्यात यावे व सदर कारवाई ही बचत गटाला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता करण्यात आलेली आहे आदर्श महिला परिवार संग यांना जाहीरनामा व नवीन दुकान प्राधिकार पत्र आदेश पारित होईपर्यंत जैसे थे ठेवण्याचे कारवाई करावी प्रकरण निकाली निघाल्यानंतर नांदा गावामध्ये आज घडीला 50 च्यावर महिला बचत गट चांगल्या रीतीने कार्यरत आहेत त्यापैकी गावातीलच एखाद्या कोणत्याही बचत गटाला सदरचे दुकान चालविण्याकरिता देण्यात यावे जेणेकरून बचत गटातील महिलांचे जीवनमान उंचावेल त्यांना आपले पोट भरण्याकरिता एक साधन उपलब्ध होईल व शासकीय नियमाच्या सुद्धा यथायोग्य पालन केल्या जाईल याशिवाय नांदा मुख्य गावाला लागून राजूरगुडा लालगुडा असे आदिवासी लोकसंख्या बहुल गाव आहेत यातिल अनेका जवळ आपल्या पोटाचा गुजरा करण्याकरिता योग्य ते साधन नाही अति आवश्यकता असलेल्या शिवाय गरजू कार्यतत्पर बचत गटाला दुकान देण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन नांदा ग्रामवासी आणि मनसे उपजिल्हा सचिव यांच्या नेतृत्वात जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.