शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरन आंदोलनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी काल पासुन केली आहे. सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला आज अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले.
आज दुर्गापूर ग्रामपंचायतच्या सरपंचां सौ पूजाताई मानकर, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, माजी सरपंच सुजित नळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, माजी उपसरपंच आसिफ खान, ग्रामपंचायत सदस्य सारंग वाकोडे, सुमेघ मेश्राम, जॉन्सन नळे, सचिन मांदाळे, निखिल हस्ते सौ. वर्षा रत्नपारखी यांनी पत्र देऊन समर्थन जाहीर केले.
तसेच सोबत ऊर्जानगर ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. मनीषा येरगुडे, उपसरपंच अंकित चिकटे, ग्रामपंचायत सदस्य राजू डोमकावळे, सागर तुरक, अनुकुल खन्नाळे, सौ. मनिष इरपाते, सौ. सारिका कावळे, सौ. राजश्री आवळे, लोकेश कोटरंगे हे सुध्दा सर्व सदस्यांसह उपोषणास्थळी येऊन समर्थन पत्र दिले असल्याने यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.