- चंद्रपुरात 'मन की बात' कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन
- भाजपा चंद्रपूर महानगर संयोजक डॉ दिपक भट्टाचार्य यांचा आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष सत्कार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संबोधन साधतात, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश द्वारा सर्व बूथ स्तरावर हा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले, नुकत्याच ३० जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भाजपा चंद्रपूर महानगर संयोजक डॉ दिपक भट्टाचार्य यांचा महाराष्ट्राचे माजी वित्त नियोजन व वनमंत्री तसेच विधीमंडळाच्या लोकलेखा समीतीचे अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महापौर सौ राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती संदीप आवारी, ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, संघटन महामंत्री राजेन्द्र गांधी, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महामंत्री ब्रिजभुषन पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, महिला मोर्चा अध्यक्षा सौ अंजली घोटेकर, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, अरूण तिखे, भारती दुदाणी, सुरेश तालेवार यांची उपस्थिती होती, डॉ दिपक भट्टाचार्य यांनी आपला हा सन्मान आ. सुधीर मुनगंटीवार, सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, सर्व शक्तीकेंद्र प्रमुख तसेच बुथप्रमुख यांना समर्पित केला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.