Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिवजयंती निमित्य गडचांदूरात 18 फेब्रुवारी ला आरोग्य शिबीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवजयंती निमित्य गडचांदूरात 18 फेब्रुवारी ला आरोग्य शिबीर धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्...

  • शिवजयंती निमित्य गडचांदूरात 18 फेब्रुवारी ला आरोग्य शिबीर
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्थानिक डॉ. प्रदीप खेकडे यांच्या रुग्णालयात 18 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजता मोफत हृदय रोग, कॅन्सर व दंत रोग निदान व उपचार शिबिर व औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जनरल मेडिकल प्रॅक्टिष्णर असोसिएशन गडचांदूर, कोरपना, आचार्य विनोबा भावे संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे वर्धा व वाइल्ड लाईफ ईनवारमेंट कानझरवेशन नेचरिंग फौंडेशन गडचांदूर व नगर परिषद गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुपर स्पेशालिटी कॅम्प मध्ये तज्ज्ञ डॉक्टर कडून तपासणी करून बी. पी.शुगर मोफत तपासणी करण्यात येईल. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत ई. सी. जि. काढून मिळेल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ह्रदय रोग व कॅन्सर रोगावर सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. नोंदणी व अधिक माहिती साठी डॉ. प्रविण लोनगाडगे, डॉ. प्रदीप खेकडे, डॉ. पंकज देरकर, डॉ. कुलभूषण मोरे, डॉ. दीपक मेश्राम, डॉ. डाखरे, डॉ. विशाल धोटे यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top