Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोवरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत 75 महिलांना रोजगार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोवरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत 75 महिलांना रोजगार सरपंच आशा बबन उकरूडे यांच्या अथक प्रयत्नांना यश 15 वर्षाच्या प्र...

  • गोवरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत 75 महिलांना रोजगार
  • सरपंच आशा बबन उकरूडे यांच्या अथक प्रयत्नांना यश
  • 15 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सत्तापरिवर्तन होताच गावात कामाला सुरवात
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील गोवरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेतर्गत विविध कामाचा सुभारंभ करण्यात आला. 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गावात सत्तापरिवर्तन होताच रोहयो अंतर्गत विविध कामाच्या माध्यमातून 75 महिलांना रोजगार मिळाला आहे.
सरपंच आशा बबन उरकुडे यांच्या अथक प्रयत्नांनी या योजनेचा लाभ गावकर्यांना मिळाला आहे. त्यांच्या हस्ते आज या कामाचे उदघाटन करण्यात आले असून गावाच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध राहून जनतेने दिलेल्या प्रेमाला न विसरता गावाची सेवा करत राहू असे मत सरपंच आशाताई उरकुडे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुनील उरकुडे, शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, माजी ग्रापं सदस्य दिगांभर देवाळकर, मधुकर सोयाम, ग्रामसेवक तुरारे, उपसरपंच उमेश मिलमिले, रोजगार सेवक राजेश कानोजवार,ग्रापं  सदस्य नीलिमाताई देवाळकर, रेखाताई सोयाम, रेखाताई पाचभाई, चेतन बोभाटे, भीमराव मिट्टूवार, शंकर बोढे आणि समस्त गावकरी व रोजगार सेवक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top