Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन ऐतिहासिक बुद्धभुमी जवळील परिसरात वाचनालयाचे बांधकाम आणि परिसर सुसज्ज करण्याकरिता १ क...

  • आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
  • ऐतिहासिक बुद्धभुमी जवळील परिसरात वाचनालयाचे बांधकाम आणि परिसर सुसज्ज करण्याकरिता १ कोटी चा निधी 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमदार धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर विविध विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला. परिसरात होत असलेल्या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर क्षेत्रात सातत्याने विकासकाम कामे पूर्ण करण्यासाठी आपण विशेष प्राधान्य देणार असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार अशी ग्वाही आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिली आहे. 
या प्रसंगी मौजा खिर्डी येथील गावालगतच्या नाल्यापासून ते राजेंद्र नालेकर यांचे घरापर्यंत रस्त्याचे दोन्ही बाजुनी पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच परिसर सुसज्ज करणे ५० लक्ष, मौजा माथा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अन्न धान्य साठवण (गोडाऊन) इमारत बांधकाम करणे २८ लक्ष, नक्षलग्रस्त निधीअंतर्गत स्मशानभूमीचे बांधकाम करणे ५ लक्ष रुपये, ४ मौजा वनसडी येथील गावालगतच्या नाल्यावर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे तसेच स्मशानभूमी जवळील जागेचे सुसज्जीकर करणे व बसस्थानक ते दारासिंग राठोड यांचे घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे ६० लक्ष,  मौजा वनसडी येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविणे १६ लक्ष, मौजा गडचांदूर जुनीवस्ती येथील ऐतिहासिक बुद्धभुमी जवळील परिसरात वाचनालयाचे बांधकाम करणे तसेच परिसर सुसज्ज करणे १ कोटी रुपये निधी च्या विविध विकासकामांचा समावेश आहे. 
या प्रसंगी जिप सदस्या कल्पनाताई पेचे, विणाताई मालेकर, उपसभापती सिंधुताई आस्वले, नगराध्यक्षा सविता टेकाम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी सभापती तथा पंस सदस्य श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती तथा पंस सदस्य संभाजी कोवे, माजी जिप सदस्य उत्तमराव पेचे, सिताराम कोडापे, जेष्ठ नेते सुरेश पा. मालेकर, न प गडचांदूर काँग्रेस गटनेते विक्रम येरणे, आरोग्य सभापती राहुल उमरे, महिला व बालकल्याण सभापती अर्चनाताई वांढरे, नगरसेवक पापय्या पोनलवार, अरविंद मेश्राम, नगरसेविका अश्विनी कांबळे, युकाँ माजी विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, युकाँ तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, संगांनि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, पंस सदस्य मिलिंद ताकसांडे, राजाभाऊ गटलगट, कृ.उ.बा.स संचालक भाऊजी चव्हाण, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष ललिताताई गेडाम, यु. काँ. महासचिव विलास मडावी, भास्कर जोगी, बाळकृष्ण कुंभारे, इरफान शेख रुपेश चुदरी, प्रा. हेमचंद्र दुधगवळी, प्रा. खैरे, गौतम भसारकर यासह कांग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top