Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एक्सयूवी वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एक्सयूवी वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात अपघातामध्ये ७ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू मृतकात आमदाराचा मुलाचाही समाव...
  • एक्सयूवी वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात
  • अपघातामध्ये ७ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
  • मृतकात आमदाराचा मुलाचाही समावेश
  • भीषण अपघातात गाडीचा झाला चुरा
आमचा विदर्भ - ब्यूरी रिपोर्ट्स
वर्धा -
वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा इथे एक भीषण अपघात झाला आहे. चारचाकी एक्सयूवी वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये ७ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीचा अगदी चुरा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी येथून वर्धाला येत असताना सेलसुरा जवळ हा अपघात झाला. वाहनावर नियंत्रण सुटल्यामुळे जवळील नदीच्या पुलावरून वाहने थेट खाली पडले. चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या मृतांमध्ये भंडारा जिल्ह्याचे आमदार विजय रहांगदळे यांचा मुलगा असल्याची माहिती आहे.
गंभीर म्हणजे मृतांमध्ये सर्वच जवळपास २५ ते ३५ वयोगटातील आहेत. रात्री एक वाजताच्या जवळपास हा अपघात झाला. चार वाजेपर्यंत मृत्यूदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापही इतर मृतदेहांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
या दरम्यान घटनास्थळी वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलीस निरीक्षक हे उपस्थित होते. सर्व मृतक हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. मृतदेह वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत तर या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top