आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
विद्युत ट्रान्सफार्मरमध्ये शुध्द तांबे असते. हे तांबे चोरणारी टोळी चंद्रपूर जिल्ह्यात सक्रीय असल्याची गुप्त माहीती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी सापडा रचून चोरीचा बेतात असलेल्या तिन चोरांना बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्यांपैकी एक आरोपी तेलंगणातील आहे. ही कार्यवाही धाबा पोलीसांनी केली. संतोष गंगाराम हुलगे, जगदीश रामचंद्र कुरेकर, सतीश सिताराम करडे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ट्रान्सफार्मर फोडण्याचे साहित्य पोलीसांनी जप्त केलं आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, गोंडपिपरी तालुक्यातील किरमीरी-टोमटा सिंचन योजनेत असलेले ट्रान्सफार्मर फोडले आणि त्यातील तांबे लंपास केले. ही घटना पंधरा दिवसापुर्वी घडली. याची तक्रार सिंचन योजनेतील कर्मचाऱ्यांनी धाबा पोलीस स्टेशनला केली होती. दरम्यान, ४ जानेवारीला परत ट्रान्सफार्मर चोरी करणाऱ्या टोळीची हालचाल सिंचन योजनेचा परिसरात दिसून आली.
योजनेचा कर्मचाऱ्यांनी याची माहिती धाबा उप पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूशिल धोकटे यांना दिली. पोलीसांनी सापडा रचला. चोरीचा बेतात असलेल्या तिघांना अटक केली. अटकेतील आरोपीकडून आरी, पाना, निरमा पावडर, पाईप, चाकू, चारचाकी वाहन, दुचाकी जप्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.