Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अंगावर शहारे आणणारी घटना पतीने पत्नीवर डिझेल ओतून जिवंत जाळले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंगावर शहारे आणणारी घटना पतीने पत्नीवर डिझेल ओतून जिवंत जाळले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स मूल - घरगुती भांडणावरून व्यसनाधीन पतीने आपल्या ...

  • अंगावर शहारे आणणारी घटना
  • पतीने पत्नीवर डिझेल ओतून जिवंत जाळले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मूल -
घरगुती भांडणावरून व्यसनाधीन पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत जाळल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यातील सुशी या गावात घडली असून उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर मुल पोलीसांनी आरापी पतीला अटक केली आहे.
सुशी या गावात 68 वर्षीय गंगाराम शेंडे आणि 65 वर्षीय मुक्ताबाई शेंडे हे पतीपत्नी राहत होते. या दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होते. गंगाराम याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो नेहमी मुक्ताबाई वर संशय घेऊन वाद घालत होता. काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात गंगाराम ने मोटार पंप करिता आणलेल्या डिझेल पत्नी च्या अंगावर ओतून माचिस ने आग लावली. मुक्ताबाई ने आरडा ओरडा केले असता शेजाऱ्यांनी धावत येऊन आग विझवले आणि मुक्ताबाई ला मुल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु जळल्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिला नागपूर येते नेत असताना वरोरा जवळ तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुक्ताबाईच्या मृतदेहाचे मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. मूल पोलिसांनी आरोपी गंगाराम शेंडे याला अटक केली असून मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड पुढील तपास करीत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top