Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खासगी रिसॉर्टमागे नवजात बाळ सापडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासगी रिसॉर्टमागे नवजात बाळ सापडले चंद्रपुरातील ताडोबात खळबळ पोलिसांकडून तपास सुरू शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - वाघांसाठी प्...

  • खासगी रिसॉर्टमागे नवजात बाळ सापडले
  • चंद्रपुरातील ताडोबात खळबळ
  • पोलिसांकडून तपास सुरू
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा व अंधारी अभयारण्यातील  आगरझरी येथे असलेल्या एका खाजगी रिसॉर्टच्या मागे नवजात शिशु सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान या बाळाला गावातील पोलीस पाटील यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 
जानेवारी महिन्यात ताडोबा, अंधारी अभायारण्यात पर्यटकांची गर्दी अधिक असते. त्यामुळं इथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांपैकी कोणी हा प्रकार केला आहे की स्थानिक नागरिकांनीच रिसॉर्टच्या बाहेर बाळ ठेवून दिलं. याबाबत अद्याप माहिती मिळाली नाहीये. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
आगरझरी येथील एका खाजगी रिसॉर्टमध्ये बाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे हे नवजात बाळ कोणी ठेवून दिलं या बाबत तर्क- वितर्क लढवण्यात येत आहेत. दरम्यान, नवजात बाळ सुखरूप असून त्याची प्रकृतीही उत्तम असल्याची माहिती आहे. तसंच, बाळ दिसायला देखील गोंडस असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top