Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: केंद्रीय निवडणूक आयोगाचा पाच राज्यांच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आता राजकीय पक्षांना उमेदवारी देण्यामागचे कारणही सांगावे लागणार केंद्रीय निवडणूक आयोगाचा पाच राज्यांच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर उ...

  • आता राजकीय पक्षांना उमेदवारी देण्यामागचे कारणही सांगावे लागणार
  • केंद्रीय निवडणूक आयोगाचा पाच राज्यांच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर
  • उमेदवाराला क्राइम रेकॉर्ड जाहीर करावे लागणार
  • राजकीय पक्षांना आयोगाची स्पष्ट सूचना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नवी दिल्ली -
भारतात करोनाची तिसरी लाट धडकली असल्याने उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार की नाहीत, याबाबत साशंकता होती. मात्र, त्याबाबतचा संभ्रम आता दूर झाला असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज या पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत विस्तृतपणे माहिती दिली. 
निवडणूक अत्यंत पारदर्शकपणे आणि भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी. मतदारांच्या मनात कोणतीही शंका राहू नये. मतदारांनी मोठ्या प्रमाणात उत्साह दाखवावा या उद्देशाने काही महत्त्वाची पावले निवडणूक आयोगाने उचलली आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती निवडणुकीला उभी राहिल्यास त्याला आपलं सगळं क्राइम रेकॉर्ड समोर ठेवावं लागणार आहे.
निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी याबाबत कठोर संदेश दिला. पक्षाच्या वतीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला उमेदवार दिला गेल्यास त्याच्यावर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती द्यावी लागेल. प्रलंबित खटले व अन्य तपशीलही जोडावा लागेल. याशिवाय त्याला उमेदवारी का दिली गेली याचे कारणही द्यावे लागेल. उमेदवाराचे नाव अंतिम करण्याच्या ४८ तास आधी ही माहिती पक्षाच्या वेबसाइटवर अपलोड करावी लागेल. अपक्ष उमेदवारासाठीही ही अट लागू असेल. know your candidate या अ‍ॅपवर हा सारा तपशील मतदारांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. त्याशिवाय न्यूज चॅनल, स्थानिक वर्तमानपत्र, न्यूज वेबसाइट या प्लॅटफॉर्मवरही संबंधित उमेदवाराचे क्राइम रेकॉर्ड जाहीर करावे लागणार आहे. त्यामुळे 'बाहुबलीं'ना आश्रय देणाऱ्या राजकीय पक्षांची पुरती कोंडी होण्याची शक्यता आहे.

असे आहेत नियम...
  • पदयात्रा, रोड शो, सायकल वा बाइक रॅली, चौकसभा यास पूर्णपणे मनाई राहील.
  • १५ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही प्रकारे जाहीर सभा आयोजित करता येणार नाही.
  • घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी असेल. त्यासाठी पाच व्यक्तींची मर्यादा राहील.
  • राजकीय पक्षांनी व्हर्च्युअल प्रचारावर अधिक भर द्यावा. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा.
  • कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्वांसाठीच बंधनकारक असेल.
  • कोविड नियमांना अनुसरून प्रचारसभा होतील. सभेला येणाऱ्या लोकांना मास्क आणि सॅनिटायजरची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित पक्षाची असेल.
  • सोशल मीडियावर करडी नजर राहील. आक्षेपार्ह वक्तव्ये वा पोस्ट याची गंभीर दखल घेतली जाईल.
  • निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास मनाई असेल.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top